महा आवाज News

हनुमान नगर येथे महिला बचत गटाने वारकरी माऊलींचे स्वागत केले …

प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..

संत सोपान काका पालखीचे माळेगांव रोड हनुमान नगर येथे महिला बचत गटाने वारकरी माऊलींचे सहर्ष स्वागत केले .

संत सोपानकाका पालखीचे बारामती मध्ये आगमन झाले असता हनुमान नगर महिला बचत गट ग्रुप गेले सात वर्षापासून देशी झाडाच्या बिया संकलित करून सिड बॉल बनवतात आणि वारकरी माऊलीकडे रस्त्याने टाकण्यास देतात.

7 000 हजार सीटबॉल तयार कले आणि पाच हजार बिया पॅकिंग करून चिवडा पॅकिंग करून पंढरीची वाट पायी चालणाऱ्या माऊलीना दिले जाते.जुनं ,जूलै मध्ये महिल बचत गटाच्या वतीने परिसरात वृक्षारोपण केले जाते. आजपर्यंत 10,000 रोपे लावली केली गेली आहे.काही वर्षांपूर्वी परिसरात लावलेली देशी झाडे आज बीज माता झाल्या आहेत. त्यांच्या बिया संकलित करून सीड बॉल तयार करुन हा उपक्रम राबवला जातो.

झाडे लावू झाडे जगवू पर्यावरणाचे रक्षण करून. हा संदेश महिलांच्या वतीने दिला गेला आहे. तसेच या प्रसंगी विशेष सहभाग बचत गट अध्यक्ष अर्चना सातव यांनी ,उपाध्यक्ष हर्षदा सातव, कविता खाडे, नीता आवडे, माधवी शेडगे, सुप्रिया सूर्यवंशी विद्या जाधव, वंदना जाधव, वर्षा पाचांगणे, स्वरुपा जाधव गौरी जराड, वैशाली परजणे,राजश्री परजणे,भारती चिकणे ,कल्पना बगाडे ,सुनिता बारवकर अमृता सुर्यवंशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उपस्थित होते.

इतरांना शेअर करा