प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
सध्याच्या स्पर्धा युगात इंदापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत, मोठ्या कष्टाने सरकारी नोकरी पटकावली. अशा युवकांचा बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांनी आज सोनाई पॅलेस येथे सत्कार केला.
युवकांचे अशा पद्धतीने करण्यात येणारे सत्कार हे केवळ त्यांचे कौतुक किंवा कसलाही शिष्टाचार नसून आपल्यातूनच पुढे गेलेल्या या सर्व मान्यवरांचा समाजाने प्रेरणा घ्यावी व भविष्यातही असे कर्तृत्ववान युवक घडावे यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केले.
पीएसआय पदी निवड झालेले बावडा गावचे महेश भीमराव गायकवाड, सातारा पोलीसमध्ये भरती झालेली रेडणी गावची सायली अंकुश कुंभार, पुणे पोलीसात भरती झालेले रेडणी गावचे सौरभ योगीनाथ माने, उत्कर्षा योगीनाथ माने, ऋतुजा योगीनाथ माने व काटी गावचे सलीम हसन शेख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समदभाई सय्यद, अमोल मुळे, संजय शिंदे, नागेश गायकवाड, महादेव लोखंडे,अली मोमीन, संदीप सोलनकर, श्रीकांत मखरे,आनंद केकान, विशाल गारदी, विनायक रणदिवे, विशाल कांबळे, रोहित चव्हाण, राहूल काळकुटे, नईम आत्तार, नितीन गोरे, गणेश बोराटे, निलेश शिंदे, सागर खेतरे, अन्सार शेख, निलेश कुंभार, नागनाथ माने, आदर्श तरंगे, मयुर बरकडे आदी उपस्थित होते.