महा आवाज News

विद्या प्रतिष्ठान मध्ये आय आय टी बॉम्बे स्पोकन टिटोरियल कार्यशाळा उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

 

विद्या प्रतिष्ठानच्या कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी.बी.ए (सी.ए.) विभागाच्या वतीने आय आय टी बॉम्बे संलग्न स्पोकन टिटोरियल कार्यशाळा आयोजित केली होती. महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी. ए.), बीएससी (कॉम्पुटर सायन्स), बी सी ए (सायन्स), वाणिज्य या विभागातील २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

या कार्यशाळे अंतर्गत इंट्रोडक्शन टू कम्प्युटर, आर डी बी एम एस, एचटीएमएल ,पीएचपी आणि माय एसक्यूएल कोर्सचे आयोजन करण्यात आले.

स्पोकन ट्युटोरियल कोर्स स्वयंपाठक आहेत. यामुळे विद्यार्थी कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून, त्यांचे शिक्षण स्वतःच्या गतीने करू शकतात. या कार्यशाळेतून विदयार्थी डेटाबेस मैनेजमेंट, डेटा संगठन, डेटा संग्रहीतीकरण, वेब साईट तयार करणे आणि डेटा प्रवाह याचे ज्ञान कसे करावे याची माहिती मिळाली.

संगणकीय भाषेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते. आजच्या डिजिटल युगात आवश्यक असलेली कौशल्ये शिकवली जातात, ज्यामुळे विद्यार्थी उद्योग क्षेत्रात अधिक स्पर्धात्मक बनतात असे प्रतिपादन विभागप्रमुख महेश पवार यांनी केले.

स्पोकन ट्युटोरियल प्रकल्प आय आय टी बॉम्बेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला असल्यामुळे त्याच्या शिक्षणाची गुणवत्ता उच्च असते.

त्यामुळे हे कोर्स विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे ,विभाग प्रमुख प्रा. महेश पवार आणि विभागातील प्राध्यापकांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, गजानन जोशी, गौतम कुदळे ,आय.क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. नीलिमा पेंढारकर, विभागप्रमुख महेश पवार, स्पोकन टीटोरिअल आय आय टी बॉम्बे महाराष्ट्राचे समन्वयक विद्या कदम यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम गुंजवटे यांनी केले. आभारप्रदर्शन अनिल काळोखे यांनी केले.

या कार्यशाळेसाठी अनिल काळोखे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील विशाल शिंदे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, अक्षय शिंदे, कांचन खिरे, वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.

इतरांना शेअर करा