विद्या प्रतिष्ठान मध्ये सायबर जन जागृती..
प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
बारामतीः येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय, व क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सायबर शिक्षा फाॅर सायबर सुरक्षा या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वसतिगृहातील मुला मुलींना सध्या शासनाच्या सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन आँनलाईन फसवणूक टाळा यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली सायबर सुरक्षेची शाळा विद्यार्थ्यांना खूप भावली.
तसेच आणखी काही योजनांमध्ये कशाप्रकारे सायबर हल्ले होत आहेत तेही पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून विद्यार्थ्यांमध्ये सायबर जनजागृती केली.
आपण या सायबर हल्या पासून कसे सावध राहावे हे देखील त्यांना समजावून सांगितले.
या पथनाट्यद्वारे वसतीग्रहा मधील २०० विद्यार्थ्यांना जनजागृती केली.
उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये अशा उपक्रमाची अत्यंत गरज असून समाजातील बरेच जण पैशाच्या खोट्या अमिषाला सहज बळी पडतात.
हे टाळण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. कोणत्याही भूलथापांना लोकांननी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमासाठी अक्षय भोसले यांनी शिक्षक समन्वयक म्हणून काम पाहिले तसेच या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे काम केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद यांनी शुभेच्छा दिल्या तसेच बीबीए (सीए) विभाग प्रमुख महेश पवार, विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम, अक्षय शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.