महा आवाज News

रेशनिंग वाटपा वरती आचारसंहिता लागू..

लोकसभा निवडणुकीचा आचारसंहितेचा फटका गरिबाला..

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..

सध्या लोकसभा निवडणुका आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे सात जून पर्यंत आचारसंहिता चालू असल्यामुळे शिधावाट सात जून पर्यंत थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

भारतामध्ये गरिबांची लोकसंख्या खूप आहे तर श्रीमंताची लोकसंख्या मूठभर आहे.
या आचारसंहितेमुळे जो शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पंधरा लाख 39 हजार 935 लाभार्थ्यांना तीन महिन्याची शिधा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महागाईला पर्याय म्हणून शासनाने राज्यातील दुर्बल घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांना उत्सव काळामध्ये लागणारे अत्यावश्यक साहित्य कमी दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा फायदा समाजातील गरीब जनतेला होत असतो.

पण लोकसभा निवडणुक आचारसंहितेमुळे गरीब जनतेला शिधा मिळणार नसल्यामुळे गरिबांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

इतरांना शेअर करा