महा आवाज News

रविवारपासून अंकिता पाटील ठाकरे यांची जनसंवाद यात्रेस होणार सुरुवात.. •इंदापूर तालुक्यात जनतेशी साधणार संवाद..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे ..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे या इंदापूर तालुक्यात रविवार (दि.13) पासून जनसंवाद यात्रा काढणार आहेत. या जनसंवाद यात्रेदरम्यान अंकिता पाटील ठाकरे ह्या इंदापूर तालुक्यात गावोगावी जनतेशी संवाद साधणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता व्याहळी या गावापासून या जनसंवाद यात्रेस सुरवात होणार आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. इंदापूरचा पक्षप्रवेश कार्यक्रम हा न भूतो न भविष्यती असा विक्रमी गर्दीत संपन्न झाला. या पक्ष प्रवेश कार्यक्रमामुळे तालुक्यातील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंकिता पाटील ठाकरे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नागरिक, युवक, महिला यांच्याशी संवाद साधणार आहेत.

इतरांना शेअर करा