प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरात साठी संपर्क:- 9373004029..
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि.24) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खा.सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, वाघ पॅलेस येथे सकाळी 10 वा. खा.सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म दिला आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे इंदापूर विधानसभेसाठी पक्षाच्या उमेदवारीबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून इंदापूर मतदारसंघातून गुरुवारी अर्ज दाखल करणार असल्याने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामती लोकसभेबरोबर इंदापूर विधानसभेतही शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नेतृत्वाखाली तुतारीचा बोलबाला वाढत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात निर्माण झालेले आहे.