महा आवाज News

इंदापूर महाविद्यालयात क्रीडा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन..

इंदापूर महाविद्यालयात क्रीडा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन.

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामधील कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा, सांस्कृतिक व NSS विभागाने ‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील’ यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी क्रीडा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले.या

वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात असे कार्यक्रम आयोजित केले जातात.

क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित होतात. मैदानी खेळातून गुणवान खेळाडू तयार होतात. तसेच रांगोळी स्पर्धेतून अनेक कलाकार तयार होऊन नवनवीन विचार मांडले जातात. शालेय शिक्षणासोबत क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थी घडतात. त्यामुळे असे उपक्रम प्रेरणादायी असतात.”

सदर उपक्रमात क्रीडा विभागाने व्हॉलीबॉल, आट्यापाट्या, कबड्डी, खो-खो, गोळाफेक याचे आयोजन केले. त्यात 272 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच रांगोळी स्पर्धेत संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील यांची रांगोळीद्वारे प्रतिमा साकारण्यात आली होती. तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळी काढल्या होत्या. यात 51 विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

सदर उपक्रम महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प् सुनिल सावंत, क्रीडा विभाग प्रमुख, प्रा. बापू घोगरे, एन.एस.एस. विभाग प्रमुख सुवर्णा जाधव, प्रा. कल्पना भोसले मॅडम, प्रा. धन्यकुमार माने, प्रा. शरद पवार, प्रा. हर्षवर्धन सरडे, प्रा. कल्याणी देवकर यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच कनिष्ठ विभागातील प्रा. भारत शेंडे, प्रा. संतोष पानसरे, प्रा. अमोल मगर, प्रा. रोहिदास भांगे, प्रा. युवराज फाळके, प्रा. भाऊ सकुंडे, प्रा. रवींद्र हगवणे, प्रा. राजीव शिरसट, प्रा. सागर गुजराथी, प्रा. अभिजीत भोसले, प्रा. आबाजी घोळवे यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. बापू घोगरे यांनी केले आणि प्रा. शरद पवार यांनी आभार मानले.

इतरांना शेअर करा