महा आवाज News

अतिक्रमण केल्यामुळे डाळज नंबर ३ मधील उपसरपंच ला गमवावे लागले पद..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर ३ येथील ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे त्यांचे उपसरपंच पद रद्द करण्यात आले आहे.


डाळज नंबर ३ येथील महादेव जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य विजय गलांडे यांच्या विरोधात शासकीय जागेत अतिक्रमण केल्या बाबतचा अर्ज दाखल केला होता.

गलांडे यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने नवीन मोठा उजवा कालवा वितरिका क्रमांक ४९ व इतरांनी अतिक्रमण करून वितरिका बुजवून त्यावर शेती करण्यास सुरुवात केली होती.

अतिक्रमण केल्यामुळे संबंधित प्रशासकीय पाटबंधारे विभागाच्या वतीने अनेक वेळा गलांडे यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. मात्र गलांडे यांनी त्या नोटीसांना दाद दिली नाही आणि पाटबंधारे यांच्या नोटिसां ना कवडी ची ही किंमत दिली नाही.

तक्रार दाखल केली असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीमध्ये अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबद्दल विजय गलांडे यांचे सदस्य पद रद्द करण्यात यावे असा नुकताच निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

डाळज नंबर ३ येथील उपसरपंच आणि सदस्य यांनी केलेल्या शासकीय जागेतील अतिक्रमण चांगलेच नडले आहे.

त्यामुळे शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्यांना डाळज नंबर ३ येथील उपसरपंच आणि सदस्यांला शासनाचा मोठा दणका बसला आहे.

इतरांना शेअर करा