प्रतिनिधी : सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी :यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी १) कृषी औद्योगिक समाज रचना / व्यवस्थापन प्रशासन २) सामाजिक एकात्मता / विज्ञान – तंत्रज्ञान ३) ग्रामीण विकास / आर्थिक – सामाजिक विकास ४) मराठी साहित्य संस्कृती / कला-क्रीडा या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव आणि पथदर्शी कार्य करणा-या व्यक्ती किंवा संस्थेस राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम २ लाख रुपये, शाल, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पारितोषिकासाठी सुयोग्य संस्था किंवा व्यक्तींची नावे विहित पद्धतीनुसार यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०००२१ या पत्यावर पाठवावीत / info@chavancentre.org या ईमेलवर पाठवावीत किंवा www.chavancentre.org या संकेतस्थळावर अपलोड करावीत. पारितोषिकाचे निकष सेंटरच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पारितोषिकासाठी नावे पाठविण्याचे अखेरची तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे.
हा पुरस्कार मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये चव्हाण सेंटरचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात येईल.हेमंत टकले
सरचिटणीस