प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्यातर्फे आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला आहे.
काल संध्याकाळी सहाच्या सुमारास ग्राम सुरक्षा दलाचा भव्य मेळावा वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता.
अनेक दिवसांपासून इंदापूर बारामती दौंड अशा अनेक तालुक्यांमध्ये ड्रोनच्या साह्याने चोरी केले जात असल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. तसेच भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
काही दिवसांनी पालखी सोहळा अनुषंगाने चोरीचे प्रमाण कमी होण्यासाठी व या गोष्टींना आळा बसण्यासाठी तसेच भुरट्या चोरांना व ड्रोन च्या साह्याने चोरी करणाऱ्या अशा चोरांना आळा बसण्यासाठी हा भव्य मेळावा घेतल्याची माहिती देण्यात आली.
या भव्य मेळाव्यामध्ये सुरक्षा दलासाठी टी-शर्ट, लाठी, बॅटरी शिट्टी इत्यादी साहित्य वाटप करण्यात आलेले आहे .
अनेक साहित्य वाटप करण्यात आले.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शन करावे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड आणि वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या सूचनेनुसार वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 39 गावे आणि तेरावाड्यांवर पंचक्रोशीतील ग्रामसुरक्षा दल सतर्क करण्यात येऊन साहित्य वाटप करण्यात आले आहे.
सदरील मेळाव्यासाठी एडवोकेट हेमंत नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधरी पोलीस उपनिरीक्षक विजय टिळेकर पोलीस उपनिरीक्षक मिटापल्ली पोलीस हवालदार गणेश काटकर पोलीस हवालदार चांदणे पोलीस नाईक जगदीश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सचिन खुळे महिला पोलीस कॉन्स्टेबल कीर्तन असे सर्व पोलीस कर्मचारी व सर्व पंचक्रोशीतील ग्राम सुरक्षा दल मोठ्या संख्येने उपस्थित होते.