महा आवाज News

विटा येथे जे के (बापू) वॉटर पार्क मध्ये महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी:- दिपाली हाके..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
खानापूर तालुक्यातील विटा फुलेनगर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
        आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जे के (बापू) वॉटर पार्क मध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते लोकप्रिय विचारवंत जाती विरोधी समाज सुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व  लोकांना शिक्षण देण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेले आहे. त्यांनी 1888 मध्ये महाराष्ट्रीयन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांनी सन्माननीय महात्मा पदीवी प्रदान केले होते.
          महात्मा ज्योतिबा फुले  आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत ज्योतिरावांनी  1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडे वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
        महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विटा येथे जे के (बापू) वॉटर पार्क मध्ये दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. वीरसेन .जे .कांबळे, अक्षय वायदंडे, सोहेल मुलानी, प्रदीप सूर्यवंशी, साहिल मुल्ला पुरे, शुभम गायकवाड, आशिष गायकवाड, आदित्य कांबळे, इरफान मुल्ला, अक्षय राजपूत, राकेश, केतन, ऋषिकेश पाटील व दलित महासंघाचे आणि विद्यार्थी संसदेचे युवक नेते सिद्धार्थ कांबळे व महासंघाचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

इतरांना शेअर करा