महा आवाज News

विद्या प्रतिष्ठान : माजी विद्यार्थ्यांकडून बी.बी .ए.- सी.ए विभागास पुस्तके भेट..

विद्या प्रतिष्ठान : माजी विद्यार्थ्यांकडून बी.बी .ए.- सी.ए विभागास पुस्तके भेट.

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

 

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बी.बी.ए- सी .ए.विभागातील माजी विद्यार्थ्यांनी विभागास शैक्षणिक अभ्यासक्रमाची पायथॉन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट ,इंटरनेट ऑफ थिंग्स, पावर बी आय डेटा मॉडेलिंग इत्यादी पुस्तके विभागातील ग्रंथालयास भेट दिली.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हनुमंत फरांदे, अमोल राऊत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे , उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे ,उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशीद ,आयक्यूएसी समन्वयक नीलिमा पेंढारकर , बी.बी.ए- सी .ए विभाग प्रमुख महेश पवार, विशाल शिंदे ,अनिल काळोखे पुनम गुंजवटे, अक्षय भोसले ,वैशाली पेंढारकर, शुभांगी निकम ,अक्षय शिंदे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ह्या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात नक्कीच उपयोग होईल तसेच सध्याच्या तांत्रिक युगामध्ये माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पुस्तके देऊन विद्यार्थ्यांच्या वाचनाचा कल वाढावा यासाठीच उपक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल प्राचार्यांनी विभागाचे व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

इतरांना शेअर करा