संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
इंदापूर मधील तहसीलदार श्रीकांत पाटील यांची नेहमीच उत्कृष्ट कामगिरीबद्दल ओळख असून आज ते इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला.
या हल्ल्यामधून इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अशा प्रकारची माहिती मिळाली आहे की इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शासकीय वाहनातून (क्र. MH 42 AX 1661)
दैनंदिन कामकाजासाठी आपल्या कार्यालयाकडे जात असताना संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चार चाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक असलेल्या मल्हारी मखरे यांचे अंगावर चटणीची पुड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला.यावेळी गाडी मध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत. दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच उडाली खळबळ उडाली आहे.