सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी :तडसर लोकसेवक श्री. वैभव सुभाष तारळेकर, वय-४५ वर्षे, तलाठी तडसर, ता. कडेगाव जि. सांगली यांना १०,०००/- रुपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडलेबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.
तक्रारदार व त्यांचा पुतण्या यांनी एकमेकांस विक्री केलेल्या शेतजमिनीची ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता लोकसेवक श्री. वैभव सुभाष तारळेकर, तलाठी तडसर, ता. कडेगाव जि. सांगली यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.२०.०६.२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.२०.०६.२०२४ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक श्री. वैभव सुभाष तारळेकर, तलाठी तडसर यांनी तक्रारदार व त्यांचा पुतण्या यांनी एकमेकास विक्री केलेल्या शेतजमिनीची ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता १०,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लागलीच कडेगाव तडसर रोडलगत असले कृष्णा अपार्टमेंट या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक श्री. वैभव सुभाष तारळेकर, तलाठी तडसर यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने लोकसेवक श्री. वैभव सुभाष तारळेकर, तलाठी तडसर रा. कृष्णा अपार्टमेंट कडेगाव तडसर रोड ता. कडेगाव जि.सांगली, मुळ रा. सरस्वतीनगर वासुंबे ता. तासगाव जि. सांगली यांचेविरुध्द कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अमोल तांबे सोो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी सो, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, श्री. संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक, श्री. दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषीकेश बडणीकर, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर वृ मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.