महा आवाज News

यशस्वी होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता व वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे,मोफत सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी सुप्रियाताई सुळे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी : संजय शिंदे…

मा. खा. व विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार, चिंचोली येथे मुलींसाठी मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम गुरुवार दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव ॲड. निलीमाताई गुजर उपस्थित होत्या.

कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक वर्गासोबत पत्रकार,भिगवण रोटरी क्लबचे सदस्य,महिला बचत गट व आजूबाजूच्या गावातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकूण ५७ सायकलींचे वाटप विद्यार्थिनींना करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सरीता शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सह शालेय उपक्रमात कमावलेल्या यशाबद्दल माहिती दिली.

मा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत कांस्य पदक पटकावून घवघवीत यश मिळवलेल्या स्वागत मलगुंडे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय ‘स्कूल संसद’ या उपक्रमात सहभागी होऊन उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या शाळेतील शिक्षिका दिपा भोईटे तसेच वैष्णवी जाधव ,संस्कार भोसले व जुई खुटाळे या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा.सुप्रिया सुळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता व वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्व प्रतिपादित केले.

तसेच वाचनाचे महत्त्व, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व दैनंदिन जीवनात प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने साधता येणारी प्रगती याचेही महत्व स्पष्ट केले.

त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपा भोईटे , सूत्रसंचालन ज्योत्स्ना पाटील यांनी तर आभार प्रदर्शन निर्मला अडेपल्ली यांनी केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सरीता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

इतरांना शेअर करा