महा आवाज News

सेंट्रल कामगार संघटना, सोशॅलिस्ट पार्टी, जिल्हा विकास संघाच्या वतीने विशालदादांना पाठिंबा

प्रतिनिधी :  सुधीर पाटील 
आटपाडी 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
    आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना जिल्हा विकास संघ, जिल्हा गवंडी सुतार सेंट्रींग कामगार संघटना आणि सोशॅलिस्ट पार्टी यांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
सोशॅलिस्ट पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हसन देसाई यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. संघटनेच्या महिला समन्वय सभा अध्यक्ष विद्याताई स्वामी, महासचिव मोहन देशमुख, जिल्हाध्यक्ष शिवाजी दुर्गाडे, विजय स्वामी यांच्यासह कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात उतरले आहेत. जिल्हा गवंडी, सुतार, सेंट्रिंग कामगार संघटनेचे सुभाष माने, श्रीकांत मोरे, निदान गायकवाड यांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे 2200 पण अधिक सदस्य आहे. हे सर्व सदस्य विशाल दादांच्या पाठीशी असल्याची ग्वाही गायकवाड यांनी दिली.
सांगली जिल्हा विकास संघाने विशाल दादांना पाठिंबा दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी लोखंडे संघटक कौतिक मौलवी महिला संघटक कांचन माने यांनी पाठिंबाचे पत्र दिले आहे.

इतरांना शेअर करा