प्रतिनिधी:- हेमंत खेडेकर..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
आज अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11000 आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात आला
लाडक्या गणपती बाप्पाला आंब्याच्या आकर्षक आरास करण्यात आली आहे मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्याच्या प्रतिकृती प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीया निमित्ताने गणराया चरणीस सेवा अर्पण करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयोग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानंतर आंब्याचा हा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. मंदिरात केलेली ही आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
आंब्याची आरास पाहण्यासोबतच गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केलेली आहे.