महा आवाज News

श्रीगोंदा शहरातुन जाणाऱ्या 548D महामार्गावर सिद्धार्थ नगर येथील लेंडी नाल्यावरील रस्त्याच्या पुलासाठी ( १०कोटी ५५ लक्ष ) रुपये निधी मंजूर झाला आहे.

प्रतिनिधी :महेश झिटे 

श्रीगोंदा

श्रीगोंदा शहरातुन जाणाऱ्या 548D महामार्गावर सिद्धार्थ नगर येथील लेंडी नाल्यावरील रस्त्याच्या पुलासाठी लोकप्रिय खासदार डॉ श्री सुजय दादा विखे पाटील व श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या प्रयत्नातून पुलाच्या कामासाठी ( १०कोटी ५५ लक्ष ) रुपये निधी मंजूर झाला आहे.

आज सकाळी ११ वाजता या कामाचं भुमिपुजन श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आदरणीय लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांचे पुत्र व लोकप्रिय खासदार डॉ श्री सुजय दादा विखे पाटील यांच्या सौभाग्यवती धनश्रीताई सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमा साठी कार्यकर्ते तसेच सुवर्णा पाचपुते, मारुती औटी, नाना कोथिम्बिरे पोपट खेतमाळीस संग्राम घोडके, संजय जगधने, माजी सभापती प्रतिभा झिटे, व संगीता जगधने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा