संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
श्री विठ्ठल रुक्माई च्या गाभाऱ्याच्या संवर्धनाचे काम करण्यात आले होते. या कामादरम्यान मूर्तीच्या सुरक्षितेसाठी समिती व प्रशासनाने केवळ मुखदर्शनाचा निर्णय घेतला होता. या कामासाठी 45 दिवसांचा कालावधी अपेक्षित होता. याबद्दल सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले गाभारावा संवर्धन आणि जीर्णोद्वार कामाच्या दरम्यान अधिकची कामे असल्याचे निदर्शनात आले. या कामासाठी पंचायत दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागला आहे आता काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दोन जून पासून भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे अशी माहिती औसेकर यांनी दिली.
श्री शेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई चे पदस्पर्श दर्शन दोन जून पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल रुक्माई मंदिराचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली विठ्ठल रुक्माई च्या मंदिराच्या संवर्धन आणि जुन्नोत्तराचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या पहाटे पाच ते सकाळी 11 दरम्यान मुखदर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे परंतु आता मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दोन जून पासून पदस्पर्श दर्शक सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान भाविकांना आषाढी वारीची ओढ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे नियोजन केले आहे. मंदिर समितीने नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
मंदिर समितीने बैठक आयोजित केले होते. या बैठकीत सदस्य डॉक्टर दिनेश कुमार कदम, शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह. भ. प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड माधवी निगडे, ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, अतुल शास्त्री भंगरे गुरुजी, ह. भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.