संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
पिंपरी चिंचवड शहरातील संत नगर मोशी प्राधिकरण सेक्टर 4 मध्ये जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे समर्थ महाराजांचे ब्रह्मांडनायक श्री समर्थ मंदिर या ठिकाणी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सुगम संगीताचा कार्यक्रम सांप्रदायिक भजन वारकरी संपूर्ण परिसरामध्ये पालखी सोहळा काढण्यात आला.सायंकाळी मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुतेज सूर्य धनंजय भाई देसाई भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे माजी नगरसेविका नम्रता ताई योगेश लोंढे विलास मंडगिरी निलेश शेटे बोराटे प्राध्यापक राजेश सस्ते निखिल बोराटे तुषार भाऊ सहाणे सरिता ताई पायमोडे व आदी मान्यवर उपस्थित होते.

भाविकांना शुभेच्छा देतेवेळी खऱ्या अर्थाने या संत नगराला शोभेल संत नगराचा संतांचे रूप आलं भक्तांचे मांदियाळी पाहून पंढरीचे रूप आल्यासारखं त्यांनी सांगितलं त्यावेळेस संस्थेचे संस्थापक पंकज भाऊ पवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सलमान करण्यात आला व आभार व्यक्त केले.
या पालखी सोहळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविकांनी सहभाग घेतला जवळपास 20 हजार लोकांनी स्वामी महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला विशेषता महिला भक्तांनी स्वामींचा जयघोष करताना आनंद लुटताना पाहायला मिळाले.