महा आवाज News

शिवणीत जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा

प्रतिनिधी:  सुधीर पाटील…
आटपाडी

आटपाडी :दि .१० रोजी कडेगांव तालुक्यातील शिवणी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला .
सामाजिक कार्यकर्त्या, कडेगाव तालुका काँग्रेस सेवादलाच्या उपाध्यक्षा, इंदिरा फेलोशिप उपक्रमाच्या कार्यकर्त्या सौ. सविता चंद्रकांत काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करताना, महिलांचे जीवन फुला प्रमाणे सदैव फुलत रहावे. या उद्देशाने सदाफुलीचे रोप लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित महिला व मुलींपैकी काहीजणींनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब , क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाता होळकर, त्यागमूर्ती माता रमाई, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी, मदर तेरेसा, कल्पना चावला यांच्या विषयी भाषणे करण्यात आली.
महिलांना राजकीय क्षेत्रात ५० टक्के हिस्सेदारीचा हक्क मिळावा आणि न्यायपूर्ण समाज या विषयावर बोलत असताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सविता काकडे (मॅडम) यांनी समाजबांधणीसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, हक्क, अधिकार तसेच शासकीय योजना याविषयी जागरूकता करणे आणि भविष्यातील भारत घडविण्यात महिलांनी आपले योग्य स्थान सुनिश्चित करण्याचे आव्हान केले. नारीशक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या वेळी सर्व स्तरातील महिला उपस्थित होत्या.

इतरांना शेअर करा