आटपाडी प्रतिनिधी :- सुधीर पाटील…
युगपरूष हे कोण्या एका जातीचे धर्माचे पंथाचे राष्ट्राचे नसतात. तर ते संपूर्ण जगाचे असतात: प्रा.डॉ. निवास वरेकर
झरे मध्ये महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालया मध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांमध्ये पार पडली यावेळी इतिहास विभागाअंतर्गत शिवजयंती निमित्त व्याख्यान घेण्यात आली यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. निवास वरेकर हे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर. एच.पाटील म्हणाले की, शिवाजी महाराजांचे विचार फक्त जयंती पुरतेच मिरवू नयेत. आपले दैनंदिन जीवन जगत असताना ते आचरणात आणावेत.
आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवला तर त्यांना कोणत्याही संकटाला सामोरे जाता येईल. यावेळी कु.किशोरी पवार आणि संतोष वाघमारे यांनी विद्यार्थी मनोगते व्यक्त केली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या शिवजयंती कार्यक्रमाचे सर्वांचे आभार मानून सांगता करण्यात आले.