दादांनी मागेही तुमची खूप कामे केली आहेत ,पुढे ही तुमची कामे करणार..
संपादक :-पल्लवी चांदगुडे ..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029 .
बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्ष सुनेत्रा ताई पवार यांनी आज गाव भेटी दौरा दरम्यान शेटफळगडे येथे घोंगडी बैठकीचे नियोजन डॉक्टर सुनील रघुनाथ वाबळे यांच्या घरी केले होते.
या भेटीमध्ये समस्त शेटफळगडे गावातील ग्रामस्थ यांनी शेतकऱ्याच्या प्रमुख अडचणी सुनेत्रा पवार यांच्या समोर मांडल्या. सध्या उन्हाळा चालू आहे, शेतासाठी चालू असलेला पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरती अजितदादांनी मार्ग काढावा असे ग्रामस्थांनी आपले म्हणणे व्यक्त केले.
अजितदादांचा पाठीमागचा इतिहास पहावा. अजित दादांनी केलेल्या कामाचा इतिहास पहावा, असे वक्तव्य सुनेत्रा वहिनी यांनी केले.
आपल्या सर्वांची साथ अशीच मतदानाच्या वेळेस असावी असे वक्तव्य सुनेत्राताई यांनी केले.
याप्रसंगी सारिका भरणे ताई यांनी समस्त शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली व त्यांच्या अडचणी नक्कीच दूर केल्या जातील असे वक्तव्य सारिका ताई यांनी शेतकरी शी बोलताना केले .
या भेटी दरम्यान लोकसभा खासदारकीच्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी पवार, इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे मा. संचालक संतोष (काका) वाबळे यांच्या फोनवरून शेटफळगडे गावातील विद्यमान सरपंच राहुल वाबळे, उपसरपंच सोमनाथ सवाने, विद्यमान मार्केट कमिटी संचालक रूपालीताई वाबळे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष साधनाताई केकान,छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका नंदाताई वाबळे ,छत्रपतीचे माजी संचालक अशोक (आबा)वाबळे, शिवसेनेच्या मा महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ शारदाताई सोनवणे, शेटफळगडे ग्रामपंचायत माजी सरपंच गोपाळ धुमाळ,शरद अण्णा झगडे, सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब पवार, मा. सरपंच विक्रम झगडे माजी ग्रामपंचायत सदस्य दादा मचाले, हनुमान विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन भीमराव (आप्पा) दौंड, वसंत राजपुरे, धनु मामा सावंत मित्रपरिवार हनुमान विकास सोसायटी लामजेवाडी, माजी चेअरमन भानुदास आबा कदम. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय राजपुरे तसेच रामदास कदम यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले.
शेटफळगडे गावातील सोसायटींचे संचालक चेअरमन विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.