प्रतिनिधी:-विजयकुमार गायकवाड..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
माझा जन्म दसऱ्याचा असल्यामुळे लढाई करायला मी कोणाला घाबरत नाही.
बारामती लोकसभा निवडणुकीत फक्त खुर्ची गरम करणाऱ्याला मतदान करण्यापेक्षा संसदेचा अनुभव असणाऱ्या अभ्यासु संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन शर्मिला पवार यांनी केले. इंदापूर तालुक्यातील कुंभरगाव येथे शनिवार ( ता.२०) रोजी आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे .
शरद पवारांना संपवण्यासाठी संपूर्ण देशातून ताकद लावली जात आहे फुले ,शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी तसेच शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे काम आपल्या सगळ्यांना करायचे आहे.

कार्यक्रमास इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, डाळजचे माजी उपसरपंच मनोहर हगारे कुंभरगावच्या सरपंच स्नेहल धुमाळ, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ, सोसायटीचे माजी चेअरमन संतोष धुमाळ, मनिषा गोरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन गोरे,मनिषा ढोले,किरण रायसोनी, अभिषेक लोंढे, अरविंद वाघमारे,सुभाष चव्हाण, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन कुंडलिक धुमाळ यांनी प्रास्ताविक सरपंच स्नेहल धुमाळ यांनी केले तर आभार स्वप्निल लोंढे यांनी मानले.