महा आवाज News

शरद पवारांच्या गटाचे दहा उमेदवार कोण?

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी १० असे जागावाटपाचे सूत्र निश्चित ठरल्याचे पवारांनी सांगितले.

पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते शरद पवारांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राज्यात लोकसभेच्या 10 जागा लढवणार असून बुधवारी पार पडलेल्या संसदीय कार्यकारणी समितीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाच्या सर्व उमेदवारांची नावे घोषित करणार आहेत .चार तास झालेल्या बैठकीत राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी तीन उमेदवारांच्या नावांचे चर्चा करण्यात आले.

त्यापैकी काही नावे निश्चित करण्यात आली.

माढा मध्ये धैर्यशील मोहिते पाटील शिरूर मध्ये अमोल कोल्हे बारामती सुप्रिया सुळे, दक्षिण अहमदनगर मध्ये निलेश लंके भिवंडी मध्ये बाळ्या मामा म्हात्रे यांची नावे जवळपास निश्चित आहेत.

दिंडोरी मध्ये चिंतामणी गावित भास्कर भंगरे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावावर चर्चा झाली रावेरमध्ये शिरीष चौधरी वर्धक अमर काळे तर बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि नरेंद्र काळे यांच्या नावावर चर्चा झाली सातारा मध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी लढण्यास असमर्थता व्यक्त केले त्यांचा मुलगा सारंग यास येथून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी सूत्रानुसार माहिती समजली.

इतरांना शेअर करा