महा आवाज News

वीस वर्षानंतर भेटले शाळेतील सवंगडी

प्रतिनिधि:- संजय शिंदे…

भिगवण भैरवनाथ विद्यालयात तब्बल वीस वर्षानंतर शैक्षणिक वर्ष २००३-०४ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात पार पडला.
यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला काहीने आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली आपले वय, पद,प्रतिष्ठा,कामाचा व्याप बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बंडू पवार होते.
प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले शालेय ऋण म्हणून शाळेला सात ग्रीन बोर्ड भेट दिले. यावेळी शाळेतील शिक्षकांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
एकत्र जमलेल्या मित्रमैत्रिणींनी दैनंदिनी, कौटुंबिक खुशाली, आरोग्य आदीविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पुढीलवर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन स्नेहमेळाव्याची सांगता झाली
कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी माजी शिक्षक पवार बंडू, कोकाटे राजेंद्र, पाटील जगन्नाथ, बिराजदार मलिकार्जुन, दराडे इनसराव, दराडे माणिक, पाटील मालती, थिटे गोरख, मते भगवान, बनकर शिवाजी, माने शंकर , प्रा.जांभळे व माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा