प्रभाग अठरा मध्ये प्रचार बैठक
सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 18 मध्ये प्रसाद गार्डन येथे श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लिफाफा (पाकीट) हे चिन्ह नवीन असल्याने ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे. तसेच प्रभाग क्रमांक 18 मधील जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्याला विशाल दादांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायची आहे असे आवाहन जयश्री वहिनींनी केले.
यावेळी माजी नगरसेवक अभिजीत भोसले, रत्नाकर नांगरे, महादेव साळुंखे, प्रतीक राजमाने, लालसाब तांबोळी, रजाक नाईक तसेच प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या