महा आवाज News

तत्कालीन शाखा अभियंता लोकसेवक श्री. राहुल विठ्ठल खाडे, (शाखा अभियंता छोटे पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद सांगली, वर्ग २, रा. रामकृष्ण परमहंस सोसायटीचे जवळ, जगदाळे प्लॉट, पोळ मळा सांगली यांनी भ्रष्ट मार्गाने अपसंपदा धारण केले बाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

प्रतिनिधी सुधीर  पाटील

सांगली :लोकसेवक श्री. राहुल विठ्ठल खाडे, शाखा अभियंता, छोटे पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद सांगली, वर्ग- २ यांनी भ्रष्ट व गैर मार्गाचा अवलंब करुन अपसंपदा कमवली असल्या बाबतचा तक्रारी अर्ज इकडील कार्यालयास प्राप्त झाला होता. प्राप्त तक्रारी अर्जाचे अनुषंगाने लोकसेवक श्री राहुल खाडे यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली आहे. प्रस्तुत उघड चौकशी मध्ये शाखा अभियंता लोकसेवक श्री. राहुल विठ्ठल खाडे, त्यांची पत्नी सौ सरोजिनी राहुल खाडे व त्यांची मुलगी विशाखा राहुल खाडे यांनी दि.७.११.१९८९ ते दि.२८.२.२०१५ या परिक्षण कालावधीत ज्ञात उत्पन्न स्त्रोताच्या विसंगत प्रमाणात १०२००११३/- रुपये (एक कोटी, दोन लाख, एकशे तेरा, रुपये) (९३ टक्के) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. लोकसेवक श्री राहुल खाडे यांनी भ्रष्ट व गैर मार्गाने कमवलेली अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी सौ. सरोजिनी राहुल खाडे व त्यांची मुलगी विशाखा राहुल खाडे यांनी त्यांना अपप्रेरणा दिली असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने लोकसेवक श्री. राहुल विठ्ठल खाडे, त्यांची पत्नी सौ. सरोजिनी राहुल खाडे व मुलगी विशाखा राहुल खाडे यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये विश्रामबाग पोलीस ठाणे जि. सांगली
येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
लोकसेवक श्री. राहुल विठ्ठल खाडे व त्यांची पत्नी सौ सरोजिनी राहुल खाडे यांचेवर विश्रामबाग पोलीस ठाणे जि. सांगली येथे भाग-५ गु.र.नं.१६१/२०१० भादविसं कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे दि.१२.०७.२०१० रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यांतुन ते व त्यांची पत्नी जामीनावर मुक्त झाले पासुन ते व त्यांचे कुटुंबीय फरारी आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, मा. श्रीमती डॉ. शितल जानवे / खराडे, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, श्री. दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक यांनी केली आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.

इतरांना शेअर करा