राष्ट्रवादी रिक्षा युनियनचा विशाल दादांना पाठिंबा
प्रतिनिधी : सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
आटपाडी : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना राष्ट्रवादी रिक्षा युनियन संघटनेने पाठिंबा दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादी महाआघाडीत आहे. मतदारसंघात अपक्ष म्हणून विशालदादा पाटील यांनी प्रचाराचा धडा लावला आहे. विविध सामाजिक व राजकीय संघटनाच्या बळावर विशाल दादा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अपक्ष उमेदवार असूनही जनतेतून त्यांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी रिक्षा युनियनने विशाल दादा पाटील यांना पाठिंबा दिल्याने शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे.
पाठिंबाचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतीक दादा पाटील यांना देण्यात आले यावेळी माजी महापौर किशोर शहा, माजी नगरसेवक संतोष पाटील, पी. एल. राजपूत, जमीर रंगरेज आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादी रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पाटील म्हणाले की, जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा, जनतेवर हुकुमशाही पद्धतीने लाभलेली भाजपची उमेदवारी पराभूत करण्यासाठी विशाल पाटील मैदानात उतरले आहेत. त्यांना राष्ट्रवादी रिक्षा युनियन तर्फे पाठिंबा देत आहोत आमच्या संघटनेचे १००० हून अधिक सभासद आहेत. त्या सर्व सभासदांना विशाल दादा पाटील यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन करीत आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे, कार्याध्यक्ष अजित पाटील, प्रमोद ओवाळे, रमेश सावंत, अमित गाडगे, मुन्नाभाई शेख, बाळू जाधव, साहेबपीर पिरजादे, सागर माने आदि उपस्थित होते.