प्रतिनिधी :सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029
आटपाडी :मुंबई -सामाजिक पटलावर अग्रेसर असणारी पुण्यातील “सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर(महाराष्ट्र)उपरोक्त संघटनेच्या शाखा खेड-दापोली-चिपळूण-संगमेश्वर तालुका वतीने “सह्याद्री ग्रंथालय” उदघाटन सोहळा नुकताच गुरुवार दि.२५ जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
“गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,आम्ही चालऊ हा पुढे वारसा” ही विचारधारणा मनाशी बाळगणारी आणि तिमिरातुनी तेजाकडे वाटचाल करणारा एकमेव संघ अर्थात “सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर(महाराष्ट्र)” या संघाने शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेत,खेड-दापोली तालुक्यातील अनुक्रमे पाच हायस्कूल मध्ये “कै. सौरभ हरिश्चंद्र नाचरे” यांच्या स्मरणार्थ सह्याद्री ग्रंथालय चालू करून येथील विद्यार्थ्यांना पुस्तकरूपी विचारांनी त्यांच्या ज्ञानात अजून भर पडावी व विद्यार्थ्यांना भौगोलिक ज्ञान मिळावे हा उद्देश डोळयांसमोर ठेऊन एक क्रांतिकारक असं शैक्षणिक पाऊल सह्याद्रीने उचलले आहे.
सदर उपक्रमाचे शुभारंभ “कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड(मुंबई) संचालित न्यू इंग्लिश स्कुल अणसपुरे हायस्कूल येथून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करून पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला. तद्नंतर दमामे हायस्कूल, पन्हाळजे हायस्कुल, होडखाड हायस्कूल, आणि शेवटी तुंबाड हायस्कूल मध्ये हा सहयाद्री ग्रंथालय उदघाटन सोहळा साजरा करून, सहयाद्री ग्रंथालयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले,प्रसंगी सर्व हायस्कूलचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक वर्ग,आणि गावातील सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला “सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर खेड,दापोली,चिपळूण,संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.उपरोक्त संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.ह्या स्तुत्य उपक्रमाचे अनेक स्तरावर अभिनंदनासह कौतुक होत आहे.