पुढील उपचारासाठी लागत आहे लाखो रुपये दानशूर व्यक्तींना मदतीची आवाहन
सेनगाव (̊ तालुका प्रतिनिधी)̊ :गणेश सुतार
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ देशमुख यांना मागील पाच महिन्यापासून मायस्थेनीया ग्रेव्हीस हा गंभीर आजार जडला असून ते पूर्णतः बेडरेस्टवर आहेत त्यांना पुढील काळासाठी तात्काळ औषध उपचाराची गरज असून या आजारामुळे पत्रकार देशमुख मृत्यूशी झुंज देत असल्यामुळे पुढील औषध उपचार माहितीचे महागडा असल्याने दानशुर व्यक्तींनी पुढे पुढे येऊन आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जात आहेत
येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मागील काही वर्षापासून पत्रकारितेचे काम करत आहेत दैनिक सामना, दलित वाणी, गाववाला या सह विविध वर्तमानपत्रात त्यांनी काम केले आहे दोन वर्षांपूर्वी त्यांना नसचा आजार उद्भवला त्यासाठी त्यांनी हिंगोली वाशिम व अकोला येथील विविध हॉस्पिटलमध्ये औषधोपचार केले हा आजार कसाबसा कमी होताच मागील पाच महिन्यापासून मायस्थेनीया ग्रेव्हीस या आजाराने त्यांना घेरले
पत्रकार श्री देशमुख यांची घरची परिस्थिती जेमतेम आहे एक मुलगा व एक मुलगी दोन्ही लेकरांचे शिक्षण सुरू आहे अकोला येथील नवजीवन न्यिरो हॉस्पिटलचे डॉक्टर अक्षय लखोटिया यांच्याकडे मायस्थेनीया ग्रेवीस आजारावर औषध उपचार सुरू केले आहेत एक आठवडा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन औषधोपचारासाठी किमान तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असून घरचा करता माणूसच घरी बेड रेस्टवर असल्यामुळे पत्रकार विश्वनाथ देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे कुटुंबातील सदस्यांनी बेडवरून उठून बसविले तरच त्यांना उठता बसता येते अन्यथा उठने बसणे बंद झाले आहे पाच महिन्यात या आजारामुळे जवळपास २० किलो वजन त्यांचे घडले आहे
मायस्थेनीया ग्रेव्हीस हा आजार जवळपास ३० टक्के नागरिकांना उद्भवतो व त्याच्यावर वेळीच औषध उपचार केले तर इलाजही होऊ शकतो याच आजारामुळे पत्रकार विश्वनाथ देशमुख मृत्यूशी झुंज देत आहेत तात्काळ औषधोपचार करणे गरजेचे असल्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे आपण केलेल्या मदतीमुळे एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदत करून दानशूर व्यक्तिमत्व पुढे येणे काळाची गरज आहे.