महा आवाज News

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीणच्या चिटणीस पदी म्हसोबावाडी गावचे उपसरपंच रमेश चांदगुडे यांची निवड

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते आज पुणे येथे निवडीचे पत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री हर्षवर्धन जी पाटील साहेब व पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

रमेश चांदगुडे हे म्हसोबाचीवाडी गावचे उपसरपंच देखील आहेत व गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असून ते भारतीय जनता पार्टीत प्रामाणिक पणे काम करत असल्याने चांदगुडे यांची दखल घेऊन त्यांची भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण च्या चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुढील काळात संघटन वाढी करता प्रमाणिकपणे काम करेल अशी आशा चांदगुडे यांनी व्यक्त केली.

या निवडीचे पत्र देते वेळी पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे, शेखर वढणे, वैशालीताई सणस, राहुल शेवाळे व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरजी कांबळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात उपस्थित होते.

इतरांना शेअर करा