महा आवाज News

आमदार राहुल कुल यांची गरीब कुटुंबाला आर्धिक मदत..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील एका शेतामध्ये ऊसतोडणी करीत असताना मजूर श्री. विष्णू करण मोरे यांच्या ३ महिने वय असलेल्या लहान बाळाचा बिबट वन्यप्राणी हल्ल्यात दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला होता.

सदर कुटुंबातील सदस्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने एकूण २५ लाख रुपयांची मदत शासनाने वन विभागामार्फत जाहीर केली होती. मुलाच्या आई – वडिलांना आमदार कुल यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. राहुल काळे, वनपाल श्री. अंकुश खरात, वनरक्षक श्रीमती शितल मेरगळ उपस्थित होते.

इतरांना शेअर करा