महा आवाज News

पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू.

प्रतिनिधी – जितेंद्र नेमाडे, दौंड…

पुणे सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू…. पुणे सोलापूर महामार्गावर इरिगेशन कॉलनी रावणगाव तालुका दौंड येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत 40 वर्षे तरुणाचा मृत्यू झाला असून सदरील घटना सोमवार दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे अपघातामध्ये मृत पावलेले व्यक्तीचे नाव परशुराम विठ्ठल खवळे वय वर्ष 40 राहणार -पाषाण पुणे,मुळगाव-जळकेवाडी तालुका -कर्जत -जिल्हा -अहमदनगर असे आहे वरील प्रकरणाची फिर्याद त्यांचा भाऊ सोमनाथ विठ्ठल खवळे वय वर्ष 30 यांनी दौंड पोलीस ठाणे मध्ये दिली आहे त्यावरून दौंड पोलिसांनी अज्ञात वाहनावरती गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार भागवत साहेब करीत आहे…

इतरांना शेअर करा