संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकीच्या वर असलेल्या रेस्टरूम मध्ये पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केलेले धक्कादायक घटना घडलेली समोर आली आहे.
नुकतीच मुंबईत घडलेली घटना ही सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आपला जीव संपवला होता. आता पुणे पोलीस दलातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. देशातील पोलीस विभागात सुरू असलेली आत्महत्येची मालिका थांबण्याचे चिन्ह दिसत नाही.
पाच एप्रिल पहाटे लोहया नगर पोलीस चौकी स्वतःवर गोळी झाडून पोलीस अमलदार भारत दत्ता अस्मर यांनी आत्महत्या केली. पोलीस हवालदार याने का केली आत्महत्या. अशी चर्चा चालू आहे.
पोलीस चौकीमध्ये कोणी नसताना येथील आराम खोलीत जाऊन खोलीचे दार आतून बंद करून त्यांनी स्वतःवर चार गोळ्या झाडल्यात. यात गंभीर जखमी झालेल्या भारत याचा जागेवर मृत्यू झाला. भारत हे काही वर्षांपूर्वीच पोलीस दलात दाखल झाले होते. या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अनेक राज्यांमध्ये पोलिसांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांचे आत्महत्या का वाढत आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे. संपूर्ण देशात पोलीस कर्मचाऱ्यांचे आत्महत्येत वाढ झाल्याने आकडेवारीतून समोर आली आहे. अशा अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्या पोलिसांना राजकीय आणि अधिकाऱ्यांच्या दबाव खाली काम करावे लागते. दबावा खाली त्यांना कधी कधी त्यांच्या कर्तव्याशी आणि त्यांच्या सन्मानाचे तडजोड करावे लागते.
काही पोलिसांना हे सहन होत नाही. आणि ते नोकरी सोडतात किंवा अशी टोकाची पावले उचलतात. अनेक घटनांमध्ये असे दिसून आलेले आहे, की पोलीस कर्मचारी तक्रार करतात की त्यांना खूप दबावाखाली काम करावे लागते 24 तासात केव्हाही ड्युटीवर हजर राहणे, सन उत्सव रजा नाही, प्रोत्साहनचा अभाव ,पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे शोषण हे देखील यातील एक कारण असू शकते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठांचे शोषण केल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. अशा परिस्थितीत पोलीस विभागाने आपले हवालदार आणि अधिकारी यांच्यात समन्वय राखलं पाहिजे. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत असं जाणकारांचं मत आहे.