महा आवाज News

पुणे धनकवडी येथे लाखो भक्तांनी श्री सद्गुरू शंकर महाराज सोहळ्याचा आनंद घेतला..

७ व्या समाधी सोहळ्यात उसळला जनसागर 
प्रतिनिधी:- हेमंत खेडेकर..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
धनकवडी – लाखो भक्तांच्या मांदियाळीत श्री सद्गुरु शंकर महाराज सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात आनंदा मध्ये साजरा झाला आहे .
सदगुरू शंकर महाराजांचा ७७ वा समाधी सोहळा हा वैषाख शुद्ध अष्टमी १५ मे रोजी  पहाटे दोन वाजता समाधीचे नवरस व पंचांमृताने विश्वस्तांच्या हस्ते समाधी स्नान झाले. त्रीकाळ आरती संध्याकाळी पालखी सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरा ला अनेक भक्तांनी चांगलाच प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.
संपुर्ण दिवसभर महा प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.
पोलीस प्रसाशनाच्या चोख बंदोबस्ता मुळे मंदिर समीतीच्या दर्शन व अन्नदान व्यवस्थेस भक्तांनी ऊत्तम प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.
अशाप्रकारे या सोहळ्याचा लाखो भक्तांना लाभ घेता आलेला आहे.

इतरांना शेअर करा