महा आवाज News

लाडकी बहिण योजना:पिंपरी चिंचवड शहरात 3 लाख 90 हजार 42 हजार 486 महिलांचे अर्ज बाद..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पिंपरी-चिंववड शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 4 लाख 32 हजार 890 तरुणी व महिलांनी अर्ज भरले. त्यापैकी 3 लाख 89 हजार 920 महिला योजनेस पात्र ठरल्या आहेत. त्यांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. तर, 42 हजार 486 अर्ज बाद करण्यात आले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेत पात्र ठरणार्‍या महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये अर्थसाह्य केले जाते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा केला जात आहे. ही योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून या योजनेसाठी तब्बल 4 लाख 32 हजार 980 महिलांनी अर्ज भरले. महापालिकेचे केंद्र, नागरी सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका, ऑनलाईन अशा माध्यमातून महिलांनी अर्ज भरले. हे अर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारले गेले. त्यानंतर अर्ज स्वीकृती बंद करण्यात आली. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 3 लाख 89 हजार 920 अर्ज वैध ठरले आहेत. त्यातील अनेकांना योजनेचा लाभही बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. तर, 42 हजार 486 अर्ज बाद करण्यात आले आहेत.

रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक 65 हजार 871 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पांजरपोळ, भोसरी येथील ई क्षेत्रीय कार्यालयात 63 हजार 106 आणि थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात 60 हजार 33 महिलाचे अर्ज योग्य ठरले आहेत. तर, निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वांधिक 10 हजार 829 अर्ज बाद करण्यात आले आहेत. पाठोपाठ ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील 7 हजार 62 अर्ज बाद झाले आहेत.

आवश्यक कागदपत्रे नसणे, पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील, मर्यादेपेक्षा उत्पन्न अधिक, एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे आदी कारणे हे बाद करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

लाभ कधी मिळणार अशी विचारणा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर 2024 पर्यंतचा लाभ अनेक लाडक्या बहिणींना मिळाला आहे. विधानसभा निवडणूक लागल्यानंतर लाभ देणे राज्य सरकारने बंद केले आहे. तसेच, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना लाभ मिळालेले नाही. लाभ कधी मिळणार, बँक खात्यात कधी रक्कम जमा होणार, अशी विचारणा महिला करीत आहेत.

इतरांना शेअर करा