प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभाग, स्वीप व्यवस्थापन कक्ष व मंथन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे लोकसभा मतदार संघांतर्गत शहरातील बुधवार पेठ भागातील जास्तीत जास्त महिलांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी महिला रॅली काढण्यात आली.
यावेळी महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, जिल्हा परीवीक्षा अधिकारी संजय सांगळे, जिल्हा संरक्षण अधिकारी अंजना मोजर, संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके, मयुर भूमकर, पद्माकर सुरुशे, प्रविण नेहरकर उपस्थित होते.
महिलांना मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी मतदानाच्या दिवसापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्रीमती रंधवे यांनी यावेळी सांगितले. मतदार ॲपबाबत माहिती देऊन मतदार यादीत नाव कसे शोधावे याबाबतही त्यांनी माहिती दिली. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.