महा आवाज News

सिंहगड रस्त्यावर भीषण अपघात..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंहगड रस्त्यावर अपघात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी गेटच्या जवळ मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे.

वडगाव : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी गेटच्या जवळ मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. दुभाजक तोडून कार थेट विरुद्ध दिशेला येऊन आदळली आहे.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून खडकवासला बाजूकडे जात असलेले दुचाकीवरील काही नागरिक थोडक्यात बचावले आहेत. कारचा वेग खूप जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

नऊ ते सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास खडकवासला बाजूकडून मद्यधुंद तरुण कारने पुण्याच्या दिशेने जात होते. एनडब्ल्युए गेट जवळ चालकाचे नियंत्रण सुटले व कार दुभाजकावर आदळून थेट विरुद्ध बाजूला गेली.

इतरांना शेअर करा