प्रतिनिधी पल्लवी चांडगुदे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी स्वरूप भुजबळ यांना दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले स्वरूप भरत भुजबळ यांचा महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला.
स्वरूप भुजबळ हे वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. पोलीस उपनिरीक्षक स्वरूप भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगितले आणि विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीसाठीचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी 11 वी, 12 वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.योग्य प्रयत्नाने आपल्याला हे यश संपादन करता येते असे मत पोलीस उपनिरीक्षक स्वरूप भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे , डॉ.भरत भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनील सावंत यांनी केले.यावेळी क्रीडा शिक्षक प्रा. बापू घोगरे आणि सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. राजीव शिरसट यांनी मानले.