महा आवाज News

प्रा अनिल बनसोडे यांना पीएचडी पदवी प्रदान

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील प्रा. अनिल चांगदेव बनसोडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठाने नुकतीच पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
“एम्बेडेड लायब्ररीयनशीप इन आय.आय.टी.ज इंडिया: अ क्रिटिकल स्टडी” हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. डॉ सत्यप्रकाश निकोशे, प्राध्यापक, ग्रंथालय आणि माहितीशास्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा अनिल बनसोडे यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे.
संशोधनासाठी “इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, नवी दिल्ली (ICSSR , New Delhi)” या संस्थेने प्रा. अनिल बनसोडे यांना “स्टडी ग्रँड” दिले होते.
पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांनी, तसेच संस्थेचे मा सचिव सर्व संचालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

इतरांना शेअर करा