प्रतिनिधी :सुधीर पाटील
आटपाडी
आटपाडी :सांगली दि: ०८ रोजी जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय क्र: जिपब- ४८२०/प्र.क्र.२०
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे की, संदर्भ क्रं.१ च्या शासन निर्णयानुसार
शिक्षक संवर्गाच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याबाबत शासनाने सुधारित धोरण निश्चित केले आहे.सदर शासन निर्णयाचे अवलोकन करून, त्यामधील विहीत तरतूदीनुसार, आपले अधिनस्त कार्यरत शिक्षकांपैकी – विशेष संवर्ग भाग १, विशेष संवर्ग भाग २, बदली अधिकार प्राप्त व बदलीपात्र या संवर्गामध्ये पात्र शिक्षकांमधून, विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती या सोबत जोडणेत आलेल्या प्रपत्रामध्ये सादर करणेची आहे. सदर माहिती सादर करीत असताना संदर्भिय शासन निर्णयामधील तरतूदींनुसार अपात्र शिक्षकांची माहिती सादर केली जाणार नाही याची संपूर्णतः जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.प्रस्तावित प्रक्रियेमध्ये विहीत मुदतीमध्ये अर्ज सादर न करणाऱ्या शिक्षकांचा बदली प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही व सदर बाबत कोणतीही हरकत तक्रार स्विकारली जाणार नाही.तसेच, सदर बदली प्रक्रिया ही शासन स्तरावरून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनाचे आधारे पूर्ण केली जाईल अथवा रद्द देखील होवू शकते या बाबी आपले अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांचा निदर्शनास आणून देवून त्याची पोहच दफ्तरी दाखल करून ठेवावी.सदरची माहिती या कार्यालयास सादर करणेचे अनुषंगाने, आपण दि.०९/०३/२०२४ रोजी सकाळी ११ पर्यंत संबंधित शिक्षकांचे अर्ज स्विकारावेत व सदर अर्जाचे पात्र अपात्रतेबाबत पुढील कार्यवाही करून, सदर माहितीची स्वाक्षरीत प्रत व सॉफ्टकॉपी दि.०९/०३/२०२४ रोजी सायं ४ पर्यंत खास दुतामार्फत या कार्यालयास सादर करणेची दक्षता घ्यावी. आपले कडील विहीत प्रपत्रातील माहिती यापुर्वी पार पडलेल्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रिया सन २०२२-२३ कामी सादर केलेल्या माहिती प्रमाणं ENGLISH FONT मधून सादर करणेची आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सांगली:मोहन गायकवाड