महा आवाज News

शरद पवारांना मोठा धक्का! प्रवीण माने यांच्याकडून अजित पवारांचा प्रचार..

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-:9373004029..

काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांचा इंदापूर मध्ये शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याप्रसंगी प्रवीण माने उपस्थित नसल्यामुळे एक वेगळी चर्चा इंदापूर मध्ये रंगलेली पाहायला मिळाली.

या चर्चेचा बॉम्बस्फोट हा जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर मध्ये उपस्थित राहिले तेव्हा प्रवीण माने यांनी त्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी अजित दादा पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केलेली पाहायला मिळाली.

इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार प्रमुख असलेले पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी सुप्रिया सुळे यांची साथ सोडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी महायुतीच्या बारामती लोकसभा उमेदवार सुनीत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या समवेत उतरले आहेत. काही दिवसापूर्वी घड्याळापेक्षा तुतारी भारी व तुतारीचा आवाज दिल्लीत घूमवू असे आव्हान करून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला प्रवीण माने यांनी सुरुवात केलेली पाहायला मिळाली होती.

आता मात्र प्रवीण माने हे घड्याळ म्हणजेच अजित दादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना पाहायला मिळाले त्यामुळे बारामती मतदारसंघांमध्ये एक अनोखी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगलेली पाहायला मिळाले.

इतरांना शेअर करा