प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 9373004029..
हवेली पोलीस स्टेशन नांदेड गाव येथे सिंहगड रोडवर दुचाकी वाहकाला चार चाकी वाहकाने धडक देऊन दुजाकी वाहकाला मारहाण करणारी गुंडागिरी प्रवृत्तीची घटना समोर आलेली आहे.
काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवम उर्फ चिक्या अनंत बरीदे वय 23 राहणार खडकवासला तालुका हवेली जिल्हा पुणे हा त्याच्या मोटरसायकलीवर नऱ्हेगाव या ठिकाणी जात असताना पाठीमागून अल्टो कार एम एच बारा सीडी 55 03 वरील चालक अमोल संतोष नेटके राहणार खडकवासला व त्याचे तीन मित्र अजय नेटके यांनी जाणीवपूर्वक दुचाकी वाहकाला धडक देऊन त्याच्या मित्राने व त्याने दुचाकी वाहकाला जुन्या भांडणाच्या खुन्नसिवर मारहाण करणारी घटना घडली आहे.
हवेली पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे तात्काळ त्या घटनास्थळी पोहोचले असता संतोष नेटके व त्याचे तीन साथीदार त्या ठिकाणाहून चार चाकी वाहन सोडून पळून गेले असता त्याची चार चाकी वाहन चा तपास केला असता त्या वाहना मध्ये चार धारदार कोयते मिळून आले.
पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी सदर बाप पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सचिन वांगळे यांना दिल्याने ते तात्काळ सदर ठिकाणी दुय्यम अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
शिव उर्फ चिक्या बरीदे यांची पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 80 / 2024 भादवी कलम 219 , 324 , 34 सह ऍक्ट कलम 4,25 अन्वे आरोपी नामे अजय संतोष नेटके व त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून त्या आरोपींचा उद्देश हा गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांच्या सूचनेनुसार सचिन वांगळे पोलीस निरीक्षक हवेली पोलीस स्टेशन यांनी सदर आरोपींचा शोध घेऊन तात्काळ दोन तपास पथके तयार करून आरोपीं चा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात हवेली पोलिसांना यश आले.