महा आवाज News

आटपाडीतील सर्व गावातून पोलिसांनी काढला रूट मार्च ..

प्रतिनिधी:- सुधीर पाटील..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

आटपाडी :दि. रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात लाँग रूट मार्च काढून पोलीस स्टेशन आवारात दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिके करण्यात आली.

दरम्यान सोपोनी जयवंत जाधव व निरीक्षक चव्हाण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन करण्यात आले या संचालनासाठी राखीव पोलीस दलाची ५० जवानांची तुकडी ही बोलविण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाले मुळे आटपाडी पोलीस निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.आटपाडी पोलीसातुन निघालेले रूट मार्च निरीक्षक सह सर्व पोलीस कर्मचारी आदीसह सुव्यवस्था रहावी या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाण्यापासून संचलनाला सुरुवात झाली.

आटपाडी शहर, करगणी, खरसुंडी, झरे, दिघंची या ठिकाणी संचलन करण्यात आले.प्रत्येक गावातील मुख्य ठिकाणी घटनास्थळी जलद गती दलाने दाखल होऊन. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत.
इतर विभागाची मदत कोणत्यावेळी घ्यायला हवी अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करुण दगडफेक करणाऱ्या जमावाला तर लाठीमार व अश्रूधुराचा वापर करुन कसे पांगवायचे अशा दंगल काबूची रंगीत तालीम झाली….

इतरांना शेअर करा