महा आवाज News

हवेली पोलिसांच्या सतर्क बंदोबस्तामुळे धुलीवंदन उत्साहात साजरी .

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

पुणे शहरातील हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील खडकवासला धरण चौक येथे हवेली पोलीस स्टेशनकडून धुलीवंदनानिमित्त नाकाबंदी करण्यात आली असून आज सकाळी नऊ वाजल्यापासून नाकाबंदी करण्यात आली होती.

पोलीस स्टेशन कडून नांदेड किरकटवाडी खडकवासला डोणजे इत्यादी परिसरात पोलीस स्टेशन कडील उपलब्ध पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे योग्य नियोजन करून सर्वत्र सतर्क बंदोबस्त लावून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क पेट्रोलिंग करण्यात आले आहे.

या वर्षी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर नाकाबंदी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हवेली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार प्रभारी अधिकारी सचिन वांगडे , सपोनी सागर पवार व इतर पाच ते सहा पोलीस अंमलदार नेमणूक सतर्क नाकाबंदी केलेली पाहायला मिळाली.

इतरांना शेअर करा