महा आवाज News

टकारी समाजाचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा..

१९९१ पासून टकारी समाजाचा अजितदादांना पाठिंबा..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
मो. नं :- 9373004029

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बारामती शहरातील टकारी समाज बांधवांची 1991 पासून चे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. टकारी समाजाचे विविध अडीअडचणी सोडवणे काम अजितदादा यांनी केले आहे. आणि नगरपरिषद मध्ये गेली २२ वर्ष टकारी समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती शहरातील व तालुक्यातील टकारी समाज बांधव महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील अशी ग्वाही टकारी समाज जनसंवाद मेळाव्यामध्ये देण्यात आली.

बुधवार दिनांक रोजी २०/०३/२०२४ बारामती दूध संघ येथे सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामती शहर व तालुक्यातील टकारी समाज बांधवांचा जनसंवाद मेळावा पार पडला.

यावेळी बारामती राष्ट्रवादी शहराचे अध्यक्ष मा. जय दादा पाटील, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन शेठ सातव, माजी नगराध्यक्ष सुभाष शेठ सोमानी शहर युवक अध्यक्ष अविनाश बांदल साहेब, महिला अध्यक्ष अनिताताई गायकवाड, सुप्रियाताई सोळाकुरे आणि पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या यशस्वी आयोजनासाठी बारामती नगरीचे उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड , ओंकार जाधव, सयाजी गायकवाड, महेश गायकवाड, संतोष जाधव, संजय गायकवाड, संजय जाधव, बाळासाहेब गायकवाड, सुभाष जाधव( सरपंच)
गणेश गायकवाड सचिन बिट्टू जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

प्रास्ताविक ओंकार जाधव यांनी केले. सयाजी गायकवाड अनिल गायकवाड अविनाश गायकवाड यांनी टकारी समाजाची भूमिका मांडली.

कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन हिंदू टकारी समाज बारामती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गौरव गजानन जाधव यांनी केले.

इतरांना शेअर करा