महा आवाज News

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी गणेश धांडोरे यांची नियुक्ती..

प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील गणेश धांडोरे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी युवा नेतृत्व गणेश धांडोरे वालचंदनगर यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे .तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी इंदापूर तालुका कार्याध्यक्ष म्हणून तडफदार नेतृत्व असणारे महारुद्र पाटील आणि सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळवून देणारे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ व पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतरांना शेअर करा