महा आवाज News

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी मा.विनायक मासाळ

 प्रतिनिधी: सुधीर पाटील…
आटपाडी

आटपाडी :राष्ट्रवादी पक्ष पार्टी महाराष्ट्र प्रदेश खा.सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष,पदी मा.विनायक मासाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले असून,पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामन्यापर्यत पोहचविण्यासाठी पक्षाला सहकार्य राहील, व असा मला विश्वास ठेऊन, पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन. उपस्थित मान्यवराकडून निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मा.विनायक मासाळ यांचे अभिनंदन करण्यात आले.
या निवडीमुळे मा.विनायक मासाळ यांच्यावर राजकीय सामाजिक सर्व जिल्हा स्थरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

इतरांना शेअर करा